Prakash Londhe
sakal
नाशिक: महिरावणी येथे बनावट दस्तऐवजाच्या आधारे अनधिकृतरीत्या कब्जा करून जमीन बळकावली. जमीन परत देण्यासाठी आणि न्यायालयात दाखल दावा मागे घेण्यासाठी ७५ लाखांची मागणी केली. तसेच, ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक ईश्वरभाई मावाणी याच्यासह प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे, दीपक मटाले, गणेश चव्हाण यांच्याविरोधात खंडणीसह ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.