Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: एक एकर व त्यापेक्षा अधिक आकाराच्या भूखंडांचे तुकडे करून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्याच्या प्रकरणावरून शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांनी यातील सोनू मनवाणी याला अटक केली. त्यानंतर आता पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, २०२० पासून महापालिकेकडे मंजूर ले- आउट तसेच बांधकाम परवानगी आणि इतर अनुषंगिक माहिती मागविली आहे.