Latest Marathi News | येवला कृ. उ. बा. समिती आवारात भरला देशातील सर्वात मोठा घोडेबाजार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horse Market

Horse Market : येवला कृ. उ. बा. समिती आवारात भरला देशातील सर्वात मोठा घोडेबाजार!

येवला (जि. नाशिक) : आज मंगळवार रोजी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात देशातील सर्वात मोठा घोडेबाजार भरला आहे. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे येवल्याचा घोडेबाजार हा इतिहास कालीन घोडेबाजार असून सुमारे ३०० वर्षांपूर्वी येवला शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे यांनी येवला शहर बसवल्यानंतर या घोडेबाजाराला सुरुवात केली होती. तेव्हापासूनचा हा घोडेबाजार महाराष्ट्रसह देशभरात प्रसिद्ध झाला...(largest horse market in country held in in yeola Agricultural Produce Market Committee premises Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Project Durga : गुंतागुंत वाढलेली असताना 'ती'ने केली कर्करोगावर यशस्‍वी मात

या येवल्याच्या घोडेबाजारामध्ये पंजाब,हरियाणा,गुजरात,कर्नाटक, मध्य प्रदेश व देशाच्या कानाकोपऱ्यातून घोड्याचे व्यापारी व खरेदीदार येत असतात पाच लाखा पासून ते पन्नास लाखापर्यंतच्या घोड्यांची येथे खरेदी विक्री होत असते.

आजच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे उदयपूरच्या राजेशाही घराण्यातील वापरलेल्या घोड्यांचा वंश असलेल्या एका घोडीची किंमत तब्बल ६१ लाखापर्यंत लावण्यात आली असल्याची माहिती या घोडीच्या मालकाने दिली आहे. घोडेबाजारातून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी दिली आहे.

हेही वाचा: PFI Case : ‘PFI’चा बाँबस्फोटात थेट सहभाग; ‘ATS’ची कोर्टात माहिती