आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या; चांदवड येथील वसतिगृहातील प्रकार

larvae in a nutritious diet reference image
larvae in a nutritious diet reference imageesakal

चांदवड (जि. नाशिक) : येथील आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील मुलांच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रश्‍नी वसतिगृहातील विविध समस्यांवर खुद्द विद्यार्थ्यांनीच शुक्रवारी (ता. १६) वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. (larvae in Chandwad hostel tribal students meals Nashik Latest Marathi News)

येथील आदिवासी वसतिगृहातील (मुले) विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्याचा ठेका एका कंत्राटदाराला दिलेला आहे. या कंत्राटदाराकडून पुरविले जाणारे जेवण नेहमीच निकृष्ट दर्जाचे असते. मुलांनी याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या होत्या. परंतु, याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. बुधवारी (ता. १४) तर जेवणामध्ये सोयाबीनची भाजी व रोटी बनविण्यात आली होती.

या भाजीत अनेक अळ्या स्पष्ट दिसून येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनीच वसतिगृह अधीक्षकांना केलेल्या अर्जात पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा भांडाफोड केला. वसतिगृहातील खिडक्या, दरवाजे, गाद्या, चादरी खराब असून, बाथरूममध्ये पाणी नसते.

अनेकवेळा वीज नसते. येथील चौकीदार तर मुलांकडून प्रवेशाचे देखील पैसे घेतो, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, महिला अधीक्षक स्वप्नाली पाटील यांनीही जेवणात अळ्या निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

larvae in a nutritious diet reference image
इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी; मागील 5 वर्षांपेक्षा सरासरी दीडपट जास्त पाऊस

कारवाईकडे लक्ष

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र, या प्रकारानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्यांची मान्यता रद्द होईल का, त्यास ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले जाईल का, त्याची बिले रद्द करून दिलेल्या बिलांची वसुली होईल का, अशी एक ना अनेक प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहेत.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तालुक्यातील मंगरूळ येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले

"मुलांच्या जेवणात अळ्या निघाल्याचे निदर्शनास आल्याबरोबर संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाला देखील याबाबत कळविले असून, सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल." -संदीप ठोंबरे, प्रभारी अधीक्षक, चांदवड

larvae in a nutritious diet reference image
नाशिकरोडला जागोजागी पुन्हा तळे; रस्त्यावरची तात्पुरती मलमपट्टी उखडली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com