New Buses in Poor Condition
sakal
लासलगाव: येथील आगारात नुकत्याच दाखल झालेल्या दहा नवीन बसपैकी चार ते पाच बस सध्या सलाइनवर आहेत, तर एका बसची समोरील काच तडकलेल्या अवस्थेत असून, काही बसचे प्रवासी दरवाजे नीट बंद होत नाहीत. त्यामुळे बस चालविणाऱ्या चालकांच्या सुरक्षेचा आणि प्रवाशांच्या जिवाचा प्रश्न गंभीर बनला आहे.