Monsoon
sakal
लासलगाव, दिंडोरी: दिवाळीच्या सणानिमित्त धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर लासलगावला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची शनिवारी (ता. १८) परतीच्या पावसामुळे धावपळ उडाली. दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने एक तास जोरदार हजेरी लावल्याने ऐन खरेदीच्या वेळी नागरिकांची तारांबळ उडाली.