esakal | लासलगाव : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

lasalgaon

लासलगाव : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

sakal_logo
By
अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि.नाशिक) : काही दिवसांपूर्वी विंचूर येथे मोठे बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर लासलगाव पोलिसांची (lasalgaon police) मोठी कारवाई झाल्यानंतर चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीचे पुन्हा एकदा डोके वर निघाल्याचे दिसत आहे. पोलीसांनी सापळा रचून पाचही जणांना ताब्यात घेतली आहे.

पाचही जण ताब्यात

मोहन (घम्या) बाबुराव पाटील व डॉक्टर प्रतिभा बाबुराव घायाळ आणि विठ्ठल चंपालाल नाबरिया या तिघांना नाशिक येथील रवींद्र हिरामण राऊत, विनोद मोहन भाई पटेल पंचवटी (नाशिक) हे लासलगाव विंचूर रोड येवला येथे पाचशे रुपयाच्या 291 बनावट नोटा तिघांना देताना नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ पीएसआय रामकृष्ण सोनवणे यांनी सापळा रचून या पाचही जणांना ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा: 1500 कोटींच्या घोटाळाप्रकरणात मुश्रीफांविरुध्द सोमय्या तक्रार दाखल करणार

हेही वाचा: वर्षभरात घेतली 5 आंतरपिके; आज 11 लाखांचे उत्पन्न

loading image
go to top