Grape Production
sakal
लासलगाव: राज्यात झालेली अतिवृष्टी, दीर्घकाळ टिकलेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या तीव्र थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादनाला बसला आहे. त्याचा थेट परिणाम वाइन उद्योगावर होताना दिसतो. द्राक्ष उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज नाशिक वाइन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाचपाटील यांनी व्यक्त केला आहे. परिणामी, राज्यातील वाइन उत्पादनात जवळपास एक कोटी लिटरची घट होण्याची शक्यता असून, याचा परिणाम थेट बाजारभावावर होणार आहे.