

Lasalgaon Onion Express Faces Major Delay as Poor Planning Leaves 387 Tonnes of Onions Behind Before Departure for Delhi
sakal
लासलगाव (जि.नाशिक) : दिल्लीतील कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या ‘कांदा एक्स्प्रेस’चा लासलगावमध्येच बोजवारा उडाला. ८४० टन कांदा दिल्लीला पाठविण्याचे नियोजन असताना प्रतवारी आणि पॅकिंगच्या ढिसाळ नियोजनामुळे ४२ तास गाडी स्थानकात खोळंबली. अखेर बुधवारी दुपारी ३.१० वाजता गाडी रवाना झाली; मात्र त्यात केवळ ४५३ टन कांदाच भरला. त्यामुळे तब्बल ३८७ टन कांदा कमी पाठविला गेला.