Lasalgaon
sakal
लासलगाव: केंद्र सरकारतर्फे नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा आता थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा कांदा केवळ २४ रुपये किलो दराने विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. याअंतर्गत लासलगावहून थेट कोलकत्ता येथे रेल्वेने नाफेडचा कांदा पाठविला जात आहे. मात्र यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.