लासलगाव : कांदाभावात घसरणीने सात कोटींचा फटका

आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव सातत्याने कमी होत आहेत.
lasalgaon onion
lasalgaon onion

लासलगाव: लाल कांद्याला २६ फेब्रुवारीला सरासरी दोन हजार शंभर रुपये भाव मिळाले होते, टप्प्याटप्प्याने भावात ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना सात कोटीहून अधिकचा फटका बसला आहे. सध्या लासलगाव बाजार समितीत लाल कांदा एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव सातत्याने कमी होत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने कांदा दरात घसरण सुरू आहे.

लासलगाव बाजारात गेल्या आठवडाभरात लाल कांद्याची १ लाख १७ हजार क्विंटल आवक झाली. लाल कांद्याच्या ज्या मालाला एका आठवड्याआधी क्विंटलमागे सरासरी २१०० चा भाव होता, तोच आता १६०० रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका आठवड्यात ५०० रूपयांनी घट झाली आहे. या हप्त्यात लासलगाव बाजार समितीमध्ये साधारणत १ लाख २९ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जवळपास ७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

उन्हात वाढ होत असल्याने देशांतर्गत मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक दाखल होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक कमी-अधिक प्रमाणात दाखल होत असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा अधिक होत आहे. यामुळे कांदा दर मोठ्या प्रमाणात घसरत आहे.

भाव १,८६१ रुपयांवर

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०९० वाहनांतून १६ हजार ३५० क्विंटल आवक होऊन लालकांद्याला कमीत कमी ७०० सरासरी १५५० जास्तीत जास्त १८६१ रुपये भाव मिळाले. ३४ वाहनांतून उन्हाळ कांद्याची ६८० क्विंटल आवक होऊन कमीत कमी ५५० सरासरी १५०० जास्तीत जास्त १९२० रुपये भाव मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com