
Punjab Floods
Sakal
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशनने पंजाब- हरियाणातील पूरग्रस्तांसाठी ४० टन कांदा पाठविला आहे. रविवारी सकाळी अकराला छत्रपती शिवाजी महाराज कांदा संकुल आवारातून कांद्याचा ट्रक फगवाडा पंजाब गुरुद्वाऱ्यासाठी रवाना झाला.