Lasalgaon Railway Station
sakal
लासलगाव: खासदार भास्कर भगरे यांनी रविवारी (ता. १२) लासलगाव रेल्वेस्थानकाला अचानक भेट देऊन ‘अमृत भारत स्टेशन विकास योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची आणि प्रवासी सुविधांची पाहणी केली. सुमारे ११ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याचा दावा असूनही, कामांमध्ये अनेक त्रुटी आणि निकृष्ट दर्जा आढळल्याने खासदार भगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कामांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले.