लासलगाव- रेल्वे स्थानकाच्या विकासाची घोषणा झाली, की जनतेच्या मनात स्वाभाविकपणे सुविधा वाढण्याची आशा निर्माण होते. स्थानकाचे नूतनीकरण झाले, इमारत भव्य झाली, प्लॅटफॉर्म चकचकीत झाला. पण गाड्याच थांबत नसतील, तर या सगळ्या सौंदर्याचा काय उपयोग... अशाच प्रकारची विसंगती सध्या नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव स्थानकात पाहायला मिळत आहे.