pollution
sakal
लासलगाव: येथील शिव नदीकाठावर असलेल्या कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे हाल सुरु आहेत. दररोज साधारण पाउण टन ओला सुका कचरा टाकला जात आहे. यामुळे तब्बल २० ते ३० फूट उंच कचऱ्याचे ढीग, पावसामुळे आलेली दुर्गंधी आणि कचरा थेट रस्त्यावर आल्याने शास्त्रीनगर ते रेल्वेस्थानक मार्ग बंद झाला. जवळच दशक्रिया शेड असल्याने तेथील कार्यक्रम सुरू असताना नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास होत आहे.