Lasalgaon
sakal
लासलगाव: कांदा काढणीनंतर कांदा आणि पात वेगळी करण्यासाठी मजुरांची मोठी टंचाई असते, ही गोष्ट हेरून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या गोंदेगाव (ता. निफाड) येथील माध्यमिक विद्यामंदिरचा दहावीचा विद्यार्थी सुमित संभाजी शिंदे आणि ओम आनंदा घुगे यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘कांदापात कापणी यंत्रा’चा आविष्कार केला आहे. या यंत्राची इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनामधून जिल्हा स्तरावरून थेट राज्यस्तरावर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.