tractor accident
sakal
लासलगाव: लासलगाव(ता. निफाड) जवळील कोटमगाव रेल्वे पुलाखाली साचलेल्या पावसाच्या व गटाराच्या पाण्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी भाजीपाल्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन मोठा अपघात टळला. मात्र, ट्रॉलीतील हिरव्या मिरचीसह सर्व भाजीपाला पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.