इंदिरानगर, राणेनगर बोगद्याची लांबी 15 मीटरने वाढविणार

indiranagar tunnel latest marathi news
indiranagar tunnel latest marathi newsesakal

नाशिक : शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर या भागातील वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे.

इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची (Tunnel) लांबी प्रत्येकी १५ मीटरने वाढणार असून, एक-एक बोगदा ४० मीटर लांबीचा होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. (length of Indira Nagar Rane Nagar tunnel will be increased by 15 meters nashik Latest Marathi News)

राणेनगर आणि इंदिरानगर नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको आणि शहराला जोडणारे हे दोन्ही बोगदे असून, बोगद्यांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड आहेत. शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे बोगदे असल्याने सकाळी व सायंकाळी या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी असते. तासन्‌तास बोगदे परिसरात वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडतात. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होते. परिणामी, वाहनधारकांची मोठी कुंचबणा होते.

indiranagar tunnel latest marathi news
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला दिले होत्या. राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे परिसरात वाहतुकीची कोंडी का होते, याचे कारणे शोधण्यात आली असून, यातूनच बोगद्यांची लांबी वाढविण्याचा निर्णय नॅशनल हायवे प्रशासनाने घेतला आहे.

आजमितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी २५ मीटर असून, आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता २५ मीटरऐवजी ४० मीटर होणार आहे.

याकामी सुमारे ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांच्या सूचनेवरून नॅशनल हायवे प्रशासनाने याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. खासदार गोडसे यांनी सोमवारी (ता. २५) हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे सादर केला.

indiranagar tunnel latest marathi news
Nashik : पावसाची उघडीप अन् 21 धरणांमधून विसर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com