Leonid Meteor Shower
sakal
नाशिक
Leonid Meteor Shower : उल्कावर्षाव पाहण्याची नाशिककरांना सुवर्णसंधी; चंद्रप्रकाश कमी असल्याने दृश्य स्पष्ट दिसणार
Tips by Sudarshan Gupta for Perfect Skywatch Experience : १७ नोव्हेंबरच्या रात्री ते १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत 'लिओनिड' उल्कावर्षाव (Leonid Meteor Shower) मघा नक्षत्रातून होताना दिसणार आहे. चंद्राचा प्रकाश कमी असल्याने आणि उल्का अत्यंत तेजस्वी व वेगाने येत असल्याने, खगोलप्रेमींना हा निसर्गाचा विलोभनीय आविष्कार स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळेल.
नाशिक: सतरा नोव्हेंबरला मध्यरात्रीनंतर मघा नक्षत्रात ''लिओनिड'' उल्कावर्षाव पहायला मिळणार आहे. हा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची नाशिककरांना संधी उपलब्ध राहाणार आहे. उल्कावर्षाचाचे निरीक्षण करणे ही खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरेल.
