child injury
sakal
सिन्नर/वडांगळी: खडांगळी व निमगाव (देवपूर)च्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा चिमुरडा जखमी झाला. बिबट्याने आजीच्या हातातून नातवाला सोयाबीनच्या शेतात ओढत नेले. मात्र आजीने धाडस दाखवून बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका केली. जखमी बालकावर नाशिकट्या बिटको रुग्णालयात उपचार करण्यात आले.