निखिल रोकडे : नाशिक- कधी काळी बिबट्या दिसला म्हणजे एकमेवाद्वितीय घटना मानली जात होती. मात्र, कालौघात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे त्यांच्या वस्तीस्थानावरच आघात झाल्याने सैरभैर झालेला बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागला आहे. दीर्घकाळ राहण्यासाठी उसाची शेती योग्य असल्याने बिबट्या तिचा आधार घेत आहेत.