नाशिक- उन्हाचा तडाखा वाढतो आहे तसतसे जंगली जनावरे लोकवस्तीच्या दिशेने येऊ लागले आहेत. काल जिल्ह्यात तीन ठिकाणी बिबट्यांनी लोकवस्तीत प्रवेश करीत, जनावरे ठार केली. सुरगाण्यात शेळ्या, अंबासनला पारडू मारले. वीरगावला बिबट्याचा संचार वाढला आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीत प्रवेश करू लागल्याच्या तक्रारी आहेत. आगंतूक बिबट्यामुळे मात्र कसमादेतील रात्रीच्या शेतीकामावर मात्र चांगलाच परिणाम झाला आहे.