Leopard
sakal
नाशिक रोड: देवळाली रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर रविवारी (ता. ११) सकाळी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या काही काळ थांबविण्यात आल्या होत्या. नाशिक वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बिबट्याला बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. मात्र जखमी बिबट्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.