वीरगाव- बिबट्यांची वाढती संख्या ही बागलाण तालुक्यांतील नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागली आहे.परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, दिवसाढवळ्या लोकवस्तीतही बिबट्या दिसू लागला आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करीत असल्याने बिबट आणि मानवाचा संघर्ष सुरू झाला आहे.