देवळा- खर्डे (ता.देवळा) येथे बुधवार (ता.२६) भरदिवसा गव्हाच्या शेतात बिबट्या दिसल्याने शेतालगत जमलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा आवाज ऐकून बिबट्याने धूम ठोकली. मात्र येथे बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.