Leopard
sakal
नाशिक रोड: जयभवानी रोडच्या चव्हाण मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (ता. १०) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. सकाळी आठला बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने नागरिक कुरेशी सय्यद व मुन्ना सय्यद यांनी ही माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाने नागरिकांच्या मदतीने बिबट्याला म्हसरूळच्या पुनर्वसन केंद्रात हलविले.