Nashik Leopard News: तारुखेडलेत बिबट्यांचा 7 शेळ्यांवर हल्ला; 3 जागीच ठार, एक जखमी, तर 3 बेपत्ता

leopard
leopardesakal

निफाड : तालुक्याच्या गोदाकाठ भागात बिबट्यांची दहशत सुरूच आहे. रविवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास गोठ्यातील सात शेळ्यांवर दोन बिबट्यांनी हल्ला चढवला.

यात तीन जागीच ठार, तर एक जखमी झाली. तीन शेळ्या बिबटे घेऊन पसार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Leopards attack 7 goats in Tarukhedale 3 killed on spot 1 injured 3 missing nashik)

तारुखेडले गावात गट क्रमांक सातमध्ये सागर वाळू जगताप यांच्या गोठ्यात पहाटे पाचला बिबटे शिरले व त्यांनी सात शेळ्यांवर हल्ला केला. त्यात तीन शेळ्या जागीच ठार झाल्या. त्याचा पंचनामा करण्यात आला.

एक शेळी गंभीर जखमी झाली. तीन शेळ्या बेपत्ता आहेत. वन विभागाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

सागर जगताप वन विभागाच्या रोपवाटिकेत कामाला होते. काम सुटल्यानंतर ते पशुधनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत होते. बिबट्यांच्या हल्ल्यात शेळ्या ठार होऊन अर्थिक नुकसान झाले आहे.

leopard
Pune Leopard Accident : वाहनाची धडक बसून नर बिबट्याचा मृत्यू: पुणे नाशिक महामार्गावरील घटना

त्यामुळे वन विभागाने परत कामावर घेण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. तारुखेडलेसह गोदाकाठ भागांत बिबट्यांची मोठी दहशत आहे. यामुळे शेतीकामांवरही परिणाम होत आहे.

"माझ्या गोट्यातील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात सात शेळ्या ठार झाल्या असून, माझे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मला वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी. मी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. लक्ष दिले असते, तर कदाचित माझे नुकसान झाले नसते."-सागर जगताप, शेतकरी, तारुखेडले

"तारुखेडले गावात दिवसेंदिवस बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळण्याच्या अटी व कागदपत्रे पूर्तता ही किचकट व खर्चिक आहे. पिंजरा भेटतो, पण स्वतः शेतकऱ्यांनी पिंजऱ्यात प्राणी आणून सोडावे लागतात, ही शोकांतिका आहे."-प्रशांत गवळी, तारुखेडले

leopard
Crime: मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वाद! लोखंडी पाईपने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com