Nashik : यंदा दिवाळीत कमी ध्वनिप्रदूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diwali.jpg

Nashik : यंदा दिवाळीत कमी ध्वनिप्रदूषण

सातपूर (नाशिक) : दिवाळीपूर्वी पर्यावरण संस्था प्रदूषण नियत्रंण मंडळाने प्रदूषणाबाबत जागृती केली असली, तरी या वर्षी नाशिककरांनी स्वतःहून प्रदूषण कमी करण्याबाबत पाऊले उचलल्यामुळे या वर्षी जास्ती जास्त ७५.८, तर सर्वांत कमी ५७.१ डेसिबल ध्वनिप्रदूषण झाल्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा: नवाब मलिक यांनी दाऊदच्या माणसांकडून जमीन विकत घेतली - फडणवीस

दिवाळीत आतषबाजीमुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या पार्श्‍वभूमीवर मंडळाने केलेल्या चाचणीतून इतर मोठ्या शहराच्या तुलनेत या वर्षी हवेचे व ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचा दावा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. हवा प्रदूषणासाठी उद्योग भवन, राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, व्हीआयपी कंपनी, आरटीओ, सिडको आदी ठिकाणी फटाक्यांची चाचणी घेतली होती. या वर्षी नागरिकांमध्ये जागृती झाली. त्यात प्रसारमाध्यमांबरोबर पर्यावरण संस्थाच्या माध्यमातून प्रदूषण न करण्याची शपथ नागरिकांना दिली होती. कोरोना संकटातून सावरत, तसेच महागाईवर कसरत करत कुटुंबप्रमुखांची बेजार झालेली परिस्थिती पाहून मुलांनीही पालकांकडे फटाक्‍यांची फारशी मागणी केली नाही. हवा प्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांवरही मंडळाने दिवाळीपूर्वीच चाचणी घेऊन संबंधिताना सूचना दिल्यामुळे घातक फटाक्‍यांना बाजारात बंदी होती.

हेही वाचा: शरद पवारांनाही समजूंदे त्यांच्या मंत्र्याने काय रंग उधळले - देवेंद्र फडणवीस

ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी (डेसिबलमध्ये)

  • सीबीएस- ७३.९

  • पंचवटी- ७५.८

  • दहीपूल- ५७.१

  • सिडको- ६४.५

  • बिटको पॉइंट- ७२.७

"या वर्षी मंडळातर्फे जनजागृती केली असली, तरी नाशिककरांनी स्वत:हून फटाक्याचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे या वर्षी महाराष्ट्रातील इतर शहराच्या तुलनेत सर्वांत कमी प्रदूषाणाची नोंद नाशिक शहरात झाली आहे."

-अमर दुर्गुळे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियत्रंण मंडळ

Web Title: Less Noise Pollution Diwali This Year Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Diwali FestivalDiwali
go to top