Nashik News: शिर्डीत Night Landingचा परवाना प्राप्त; फडणवीसांनी PM, ज्योतिरादित्य शिंदेंचे मानले आभार

Shirdi International Airport
Shirdi International AirportSakal

मुंबई : शिर्डीत दर्शनाला जाणाऱ्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत ‘नाइट लँडिंग’ची सुविधा प्राप्त झाली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाकडून याबाबतचा गुरुवारी (ता. १६) सकाळी परवाना प्राप्त झाला आहे. श्री. फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले. (Licensed for Night Landing in Shirdi international airport Fadnavis thanked PM modi Jyotiraditya Shinde Nashik News)

नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधानांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुरू झाली. आता ‘नाइट लँडिंग’ची सवलत मिळाल्याने शिर्डीत साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्‍यांना रात्री प्रवास करून येता येईल. यामुळे भाविकांना मोठ्या सुविधा निर्माण होतील. गेल्या काही कालखंडापासून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर श्री. फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासात आणखी एक भर घातली आहे. शिर्डी विमानतळ श्री. फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये सुरू झाले होते.

विमानाच्या ‘नाइट लँडिंग’मुळे शिर्डीयात्रा तर सुलभ होईलच. शिवाय या परिसराच्या विकासाला गती प्राप्त होईल. भाविकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल. तेव्हा साधारणत: मार्च-एप्रिलपासून आता रात्रीच्या विमानसेवेला सुरवात होईल. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा आहेत.

.....

Remarks :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com