Nashik News: सिन्नरमध्ये सर्वांत मोठ्या गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा! बुधवारी महाप्रसादाने सांगता

सिन्नर येथे श्री महागणपती देवस्थानच्या महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवार (ता. १०)पासून प्रारंभ झाला.
Devotees and priests during Maha Abhishekam to Mahaganpati Murthy
Devotees and priests during Maha Abhishekam to Mahaganpati Murthyesakal

सिन्नर : येथे श्री महागणपती देवस्थानच्या महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवार (ता. १०)पासून प्रारंभ झाला. मंगळवारी (ता. १३) सांगता होणार आहे. महागणपतीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. सात दिवस धार्मिक सोहळा चालणार आहेत. नऊ यज्ञ कुंडाद्वारे दोन लाख ५१ हजार आहुती दिल्या जाणार आहेत.

रोज सकाळी आठला नित्य पूजा, अकराला महायज्ञ, दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत अथर्वशीर्ष पठण, गुरुवारी (ता. ८) पालखी मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी (ता. १३) महाप्रसादाचे वाटप होईल.

महाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सिन्नर वैभव महागणपती जीर्णोद्धार समितीने केले आहे. (Life of biggest Ganesha idol in Sinnar Mahaprasada says on Wednesday Nashik News)

येथील पेंटर आणि मूर्तिकार (कै.) रंगनाथजी लोखंडे यांनी १९४७ ला महागणपतीची मूर्ती घडविली आहे. त्यावेळी ८०० रुपये खर्च आला होता.

महागणपतीला यंदा ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. महागणपती १४ फूट उंच असून, डाव्या सोंडेचा आहे. महागणपती लांबूनच दिसतो. महागणपती चतुर्भुज आहे. त्याच्या वरच्या दोन हातात परशू आणि पाश आहेत.

उजव्या हाताने गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देत असून, त्याच्या डाव्या हातात लाडू आहे. समोर वाहन मुष्कराज हात जोडून उभे आहेत. गणपतीला शेंदूर लावला जात नाही. त्याऐवजी दरवर्षी लाल रंगाने रंगवितात.

त्यामुळे दरवर्षी गणपतीचे आकर्षण अधिकच वाढते. चित्रपट निर्माणकर्त्यांना महागणपतीचे आकर्षण वाटते. ‘पुजारीन’ या हिंदी चित्रपटात महागणपतीचे चित्रीकरण झाले होते.

चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांनी आपल्या राजकमल स्टुडिओतील गणपती मूर्तिकार (कै.) रंगनाथ लोखंडे यांच्याकडून घडवून घेतली होती.

Devotees and priests during Maha Abhishekam to Mahaganpati Murthy
Bal Yeshu Yatra: बाळ येशू यात्रेची उत्साहात सांगता! देश-विदेशातील 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन

१९६६ ला आंतरराष्ट्रीय एअर इंडिया कंपनीने कॅलेंडर प्रसिद्ध केले. त्यात ऑगस्ट महिन्यावर महागणपतीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. गुगलवर सर्च करून हा फोटो शोधून काढला आहे.

आजही सिन्नरला येणारा प्रत्येक भाविक किंवा पर्यटक महागणपती पाहतो आणि महागणपतीची स्मृती आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवतो, असा अनुभव आहे.

महागणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व परदेशातून भाविक येत असतात. महागणपती जीर्णोद्धारसाठी येथील ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, उद्योगपती (स्व.) लालाशेठ चांडक, ‘मविप्र’चे संचालक कृष्णाजी भगत यांचे मार्गदर्शन लाभले.

Devotees and priests during Maha Abhishekam to Mahaganpati Murthy
Nashik News: चिचोंडी येथे 67 पिशव्यांचे रक्त संकलन; विधायक उपक्रमातून मेजर नारायण मढवई यांना आदरांजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com