Liquor
sakal
नाशिक: रविवारी (ता. २) कार्तिकी एकादशी असल्याने मद्यविक्री बंद असताना, अवैधरीत्या मद्यसाठा करून विक्री करताना महागड्या कारसह एकाला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करत कारसह मद्यसाठा असा सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सुरेश अडवानी (३५, रा. गोविंदनगर) असे अवैधरीत्या मद्यविक्री करताना अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.