esakal | लॉकडाऊनमुळे जेव्हा नाशिकला अडकलेल्या चिमुकल्याचा होतो "हॅपी बर्थडे'! निवारा शेडमध्ये येतो माणुसकीचा प्रत्यय!
sakal

बोलून बातमी शोधा

nivara shed bday 2.jpg

उत्तर प्रदेशात गावाकडे जाऊन भव्य-दिव्य स्वरूपात आपल्या चिमुरड्याचा वाढदिवस साजरा करण्याचे त्याच्या कुटुंबाचे नियोजन होते. मात्र देशात संचारबंदी जाहीर झाली. रेल्वेगाड्या बंद झाल्या. त्यामुळे मुंबईहून उत्तर प्रदेशात गावाकडे जाण्याच्या ओढीने पायीच निघालेल्या बाराशेवर उत्तर भारतीय नागरिकांना इगतपुरीतील मानस हॉटेलजवळ प्रशासनाने अडवून क्वारंटाइन केले. मुंबईतून निघालेले 253 जण आदिवासी विकास विभागाच्या शिवाजीनगर येथील वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार अशा विविध राज्यांतील या कुटुंबांपैकी विजयकुमार व ऊर्मिला निषाद यांचाही समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे जेव्हा नाशिकला अडकलेल्या चिमुकल्याचा होतो "हॅपी बर्थडे'! निवारा शेडमध्ये येतो माणुसकीचा प्रत्यय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावाने जगभरातील नागरिकांचे बळी घेतले. गावोगावी अनेकांना बंदिस्त केले आहे. तसे कुठलाही संबंध नसलेल्या विविध प्रांतांतील लोकांना एकत्रही आणले. निवाराशेडवर शुक्रवारी (ता. 10) अशाच एका विविध प्रांतीय माणुसकीचा प्रत्यय आला. विविध प्रांतांतील निराश्रित, मराठी अधिकारी या सगळ्यांनी चॉकलेट, केळी, बिस्कीट जवळ आहे, अशा मिठाई स्वरूपातील भेटवस्तू व शुभेच्छा देत चिमुरड्याचा आयुष्यातील पहिला वाढदिवस साजरा केला. 

निवारा केंद्रात विविध भाषांत "हॅपी बर्थडे'चा सूर...
बिनय विजयकुमार निषाद (वय 1) असे या भाग्यवान चिमुरड्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशात गावाकडे जाऊन भव्य-दिव्य स्वरूपात त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे त्याच्या कुटुंबाचे नियोजन होते. मात्र देशात संचारबंदी जाहीर झाली. रेल्वेगाड्या बंद झाल्या. त्यामुळे मुंबईहून उत्तर प्रदेशात गावाकडे जाण्याच्या ओढीने पायीच निघालेल्या बाराशेवर उत्तर भारतीय नागरिकांना इगतपुरीतील मानस हॉटेलजवळ प्रशासनाने अडवून क्वारंटाइन केले. मुंबईतून निघालेले 253 जण आदिवासी विकास विभागाच्या शिवाजीनगर येथील वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार अशा विविध राज्यांतील या कुटुंबांपैकी विजयकुमार व ऊर्मिला निषाद यांचाही समावेश आहे. त्यांना "बिनय' हा एक वर्षाचा चिमुरडा. त्याचा शुक्रवारी पहिला वाढदिवस होता. ही बाब निवाराशेडची व्यवस्था पाहणारे नायब तहसीलदार परमेश्‍वर कासोळे यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी त्यांचे सहकारी मनोज गांगुर्डे, एस. एम. शिंदे यांना सांगत बिस्कीट, चॉकलेटसह गोडधोड पदार्थांची व्यवस्था केली. वसतिगृहाच्या मोकळ्या मैदानावर सुरक्षित अंतर पाळण्याचे पाठ देत अनोख्या पद्धतीने चिमुरड्याचा वाढदिवस साजरा केला. निवाराशेडवर सकाळी नाश्‍त्याच्या निमित्ताने जमलेले विविध प्रांतांतील निवाश्रितांनी तितक्‍याच उत्साहाने सहभागी होत चिमुरड्याला शुभेच्छा देत त्याच्या उदंड आयुष्याची कामना केली. 

हेही वाचा > BREAKING : मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात मृत्यू.. कोरोनाचा दुसरा बळी सुद्धा मालेगावातूनच

विविध प्रांतांतील नागरिकांनी साजरा केला चिमुरड्याचा पहिला वाढदिवस 
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. शिवाजीनगर निवाराशेडवर 253 कुटुंबे आहेत. गाव आणि कुटुंबापासून दूर असलेल्या या कुटुंबांना निवाराशेडमध्ये राहण्याची वेळ आली आहे. परिस्थिती निवळल्यानंतर ते त्यांच्या गावाला जातील. मात्र नाशिकच्या पहिल्यावहिल्या वाढदिवसाच्या स्मृती "त्या' कुटुंबाच्या मात्र कायमच स्मरणात राहतील. - परमेश्‍वर कासोळे, नायब तहसीलदार 

हेही वाचा > BREAKING : कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या...नाशिकमधील धक्कादायक घटना 

loading image