निखिल रोकडे: नाशिक- परस्पर संमतीने म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप काही काळ एकत्र राहिल्यानंतर विविध कारणाने नंतर शारीरिक व मानसिक छळ झाल्याची तक्रार करण्यात येते. मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदरच तक्रारदार जबाबावर ठाम राहीलच असे होत नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये संशयितावर गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.