LLB CET Exam : एलएलबी सीईटीचे प्रवेशपत्र उपलब्‍ध

 exam
examesakal

LLB CET Exam : पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या ‘एलएलबी’ अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी सीईटी परीक्षा येत्‍या मंगळवार (ता.२) आणि बुधवारी (ता.३) होणार आहे. ऐन परीक्षेच्‍या तोंडावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्‍ध झाल्‍याने त्‍यांच्‍यातील संभ्रम दूर झालेला आहे. (LLB CET Admit Card Available nashik news )

साधारणतः सीईटी परीक्षेच्‍या किमान आठवडाभर आधी प्रवेशपत्र उपलब्‍ध करणे अपेक्षित असताना एलएलबी (३ वर्षे) शिक्षणक्रमाच्‍या सीईटीचे प्रवेशपत्र उपलब्‍ध झालेले नव्‍हते. त्‍यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

दोन दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेली असताना, प्रवेशपत्र उपलब्‍ध होत नसल्‍याने मनस्‍ताप व्‍यक्‍त होत होता. त्‍यातच काल (ता.२९) सायंकाळी उशिरा सीईटी सेलकडून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले गेले. परीक्षार्थीना तसा एसएमएस करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 exam
MUHS Summer Internship Program: आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एंन्‍ट्रन्‍सशिपचा प्रोग्रॅम; ही आहे मुदत

यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. अर्ज क्रमांक व इतर वैयक्‍तिक माहिती दाखल करून प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची लगबग विद्यार्थ्यांची सुरु राहिली.

दोन दिवस ही परीक्षा पार पडणार असल्‍याने, विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशपत्रावर परीक्षेची दिनांक, वेळ तसेच परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता असा संपूर्ण तपशील उपलब्‍ध करुन दिलेला आहे. त्‍यानुसार परीक्षेस उपस्‍थित राहण्याचे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे.

 exam
Nashik News : महामार्ग बसस्थानकाचे रुप पालटणार! मॉल, शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट आदी सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com