LLB First Year Exam Date : ‘एलएलबी’ प्रथम वर्षाची 9 पासून परीक्षा

llb
llb esakal

LLB First Year Exam Date : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयांतर्फे प्रथम वर्षाच्‍या परीक्षांचे आयोजन ९ सप्‍टेंबरपासून केले जाणार आहे.

यासंदर्भात पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना केल्‍या आहेत. (LLB First Year Exam Date Examination from 9 september nashik news)

पाच वर्षे व तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाच्‍या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने सूचित केले आहे. पुणे विद्यापीठाने विधी महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांसाठी सूचना जारी केलेली आहे.

परिपत्रकानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार विधी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्‍या एप्रिल-मे २०२३ या सत्राच्‍या परीक्षा ९ ते २२ सप्‍टेंबर या कालावधीत घेण्यात याव्यात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

llb
New Law : सहमतीने संबंधाचं वय १६ वर्षे, नवीन कायदा पारित

विद्यापीठ प्रचलित नियमानुसार पारंपरिक पद्धतीने परीक्षांचे आयोजन करावे.

संबंधित परीक्षांसाठी आवश्‍यक असलेल्‍या सर्व अभ्यासक्रमांमधील नमूद विषयांचे वेळापत्रक व प्रश्‍नपत्रिका महाविद्यालयीन स्‍तरावर तयार करून घ्याव्या व निर्धारित कालावधीत परीक्षांचे आयोजन करण्याचे महाविद्यालयांना सूचित केले आहे.

llb
Law of Property: मुलाच्या मालमत्तेवर आईचा जास्त अधिकार की पत्नीचा? वाटणी कशी होते, काय आहे कायदा जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com