राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सहकारमंत्र्यां

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सहकारमंत्र्यां
Published on: 
(बातमी फोटोसह दोन कॉलम आजच घ्यावी) NSK26H34546 मुंबई : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे. ---------------- कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी पोर्टल सुरू करा ------- राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सहकारमंत्र्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा निंभोरा (ता.रावेर), ता. ५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. या त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे पोर्टल तातडीने सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. योजनेअंतर्गत शासनाने आतापर्यंत चार टप्प्यांत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. अनेकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी आधार कार्ड व बँक खात्यातील नावातील तफावत, कर्ज खात्यांतील त्रुटी, मयत कर्जदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत नसल्याने काही प्रकरणे प्रलंबित आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांत या त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना बँका व संबंधित शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँकांचे पोर्टल सुरू करून विहित कालमर्यादेत त्रुटी दूर करण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनात आहे. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबतही शासनाने स्पष्टता द्यावी. दुष्काळी मदत, अग्रीम रक्कम, पीकविम्याची प्रलंबित देयके व मागील वर्षातील थकीत दुष्काळ अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा. शेतीचा वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. म्हणून कर्जमाफीपासून कोणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा भाग्यश्री ठाकरे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.