नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एका मतदान केंद्रात सरासरी ८०० ते एक हजार मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मतदान केंद्रांचे नियोजन करून तेथे मतदारांसाठी विविध सुविधा पुरवाव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले.