नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभागनिहाय मतदारयाद्या विभागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. आयोगाने याद्यांच्या विभागणीसाठी मार्गदर्शक सूचना आखून दिल्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोयीच्या मतदारयाद्यांसाठी आग्रही असलेल्या इच्छुकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.