
मनमाड (जि. नाशिक) : सतत गजबजत असलेल्या मध्य रेल्वेचे मनमाड स्थानक भकास झाले आहे. कोरोना इफेक्ट आणि लॉकडाउनमुळे प्रवासीसंख्या घटल्याचा दुष्परिणाम येथील अर्थकारणावर झाल्याने टॅक्सी, रिक्षाचालक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे येथील लॉज, हॉटेलही ओस पडले आहेत. (lockdown of Manmad railway station has deprived many vendors of employment)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर करून प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे मनमाड रेल्वेस्थानकावर सध्या शुकशुकाट असल्याने भकास दिसत आहे. सतत गर्दी, आरडाओरड असलेल्या मनमाड रेल्वेस्थानकावर मोजक्याच रेल्वेगाड्या येत आहेत. त्यामुळे स्थानक आणि स्थानकाबाहेरील परिसरात गर्दीच नाही. स्थानकावर काही पोलिस, रेल्वे कर्मचारी आणि काही प्रवासी दिसले. कोरोनामुळे रेल्वेच्या कामकाजाची पद्धत बदलली आहे. यापूर्वी कुणीही सहज फलाटावर जाऊ शकत होता. परंतु, आता सुरक्षित अंतर ठेवून रेल्वेस्थानकात प्रवेश करावा लागतो. तोही आरक्षित कन्फर्म तिकीट असेल तरच जाता येत आहे. फलाटावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. भुसावळ विभागात असलेल्या मनमाड रेल्वेस्थानकावर रोज २५० पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा असते. स्थानकावरील फलाटांवर खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबीयांचे पोट भरतात. मात्र, कोरोना इफेक्ट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने स्थानकावर जाण्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील काम करणाऱ्या सर्वच हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
रेल्वेस्थानकाबाहेरील व्यावसायिकांवरही तशीच उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रवाशांचे सामान वाहून नेणारे कुलीसुद्धा अडचणीत आले आहेत. रेल्वेवर अवलंबून असणारे हमाल, टॅक्सी, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल्सचीही तीच स्थिती आहे. हातावर पोट असल्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चिंता स्पष्ट दिसत आहे.
(lockdown of Manmad railway station has deprived many vendors of employment)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.