लॉकडाउन ठरला टर्निंग पॉइंट! वेळेचा सदुपयोग करत प्रदीपची रेखीव कामगिरी; परिसरात होतंय कौतुक

pradip.jpg
pradip.jpg

डुबेरे (नाशिक) : कोणताही कलाकार कला रेखाटताना आपण घेतलेल्या कलेच्या शास्त्रशुद्ध अद्ययावत शिक्षणाची जोपासना करत असतो. परंतु, प्रदीप शिंदे यांनी कुठल्याही प्रकारचे चित्रकलेचे औपचारिक शिक्षण न घेता शंभर ते दीडशे रेखाचित्रे व पेंटिंग करून परिसरात नावलौकिक मिळवला आहे. 

रेखाटली दीडशेहून अधिक रेखाचित्रे 

वडगाव पिंगळा या सिन्नर तालुक्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रदीप शिंदे या कलाकाराने रेखाकला किंवा रंगकामाचे कुठलेही शिक्षण न घेता चित्रकला आत्मसात केली. प्रदीप सैन्य भरतीत जाण्यास उत्सुक होता. मात्र घराची परिस्थिती नाजूक असल्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. वडगाव पिंगळा गावात प्रदीपचे आई-वडील छोटेसे हॉटेल चालवतात. त्यावरच घराचा उदरनिर्वाह होतो. प्रदीपने बारावीनंतर सिन्नर येथे कारपेंटर आयटीआय करून प्रथम क्रमांक मिळवला. मात्र, त्याला नोकरीची संधी मिळाली नाही. त्यावर निराश न होता त्यांनी सैन्य भरतीचा मार्ग निवडल्यानंतरही निराशाच येत होती. परंतु, येथेच न थांबता त्याने महाराष्ट्र शासन सुरक्षारक्षक विभागात नोकरी मिळविली. 

शिक्षक रवींद्र मालुंजकर यांचे मार्गदर्शन

सिन्नर एमआयडीसी मध्ये एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू झाला. मात्र, काही दिवसांत ही कंपनी बंद पडली आणि प्रदीपवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र हार न मानता प्रदीपने नाशिकच्या आडगाव येथील दहावी-बारावी बोर्डच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी सुरू केली आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक, देवदेवता, अधिकारी, शिक्षक यांच्यासह आई-वडील व आप्तेष्टांचीही चित्रे रेखाटली आहेत. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. 

सुरक्षारक्षक म्हणून जरी काम करीत असलो तरी मला त्याची लाज वाटत नाही. आजपर्यंत जी कला आत्मसात केली आहे ती एक सुरक्षारक्षक झालो म्हणून आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या वरिष्ठांमुळेच. कोरोनाला एक संधी म्हणून बघितले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. त्यामुळेच हाताची बोटे फिरू लागली आणि चित्र कागदावर उमटू लागली. यापुढेही समाजोपयोगी नवनवीन कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. - प्रदीप शिंदे, चित्रकार, वडगाव पिंगळा  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com