"मशाली, टेंभे लावून त्यांना हाकलून लावा.." सूचना दिल्या खऱ्या पण झालं उलटचं!

tol dhad.jpg
tol dhad.jpg

नाशिक : टोळ कीटक आल्यास डबे, पत्रे, ढोल, सायरन, ट्रॅक्‍टरने आवाज करावा. शिवाय शास्त्रीयदृष्ट्या फवारणी करावी. मशाली, टेंभे लावून टोळधाड जाळावी आणि आपल्या क्षेत्रातून हाकलून लावावी, अशा सूचना नंदुरबारच्या कृषी विभागातर्फे देण्यात आल्या होत्या. तसेच उपाययोजनांची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोचविली होती. पण वाऱ्याची दिशा बदलली.. अन् संकटही टळले 

वाऱ्याची दिशा बदलली.. अन् संकटही टळले 

नंदुरबारच्या कृषी विभागातर्फे करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविली होती. प्रत्येक गावात शेतकरी गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. सायंकाळी टोळ कीटक लाखोंच्या संख्येने शेतात उतरू शकतात. टोळ कीटक आल्यास डबे, पत्रे, ढोल, सायरन, ट्रॅक्‍टरने आवाज करावा. शिवाय शास्त्रीयदृष्ट्या फवारणी करावी. मशाली, टेंभे लावून टोळधाड जाळावी आणि आपल्या क्षेत्रातून हाकलून लावावी, अशा सूचना दिल्या होत्या. 

राजस्थानवरून टोळधाड उत्तर प्रदेशकडे सरकली

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश असा टोळधाडीच्या मार्गाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात अमरावती, वर्ध्याहून काटोल- नागपूरमार्गे टोळधाड भंडारा भागात पोचली. इथून ती मध्य प्रदेशात जाईल, असे "ट्रॅकिंग'वरून दिसते. राजस्थानवरून टोळधाड उत्तर प्रदेशकडे सरकली आहे. त्यामुळे यंदा गुजरातला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात तिचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही. पाण्याच्या दिशेने टोळधाडीचे थवे झेपावतात, अशी माहिती कृषी विभागापर्यंत पोचली होती. 

वाऱ्याने दिशा बदलल्याने टोळधाडीचे शहादा-नंदुरबारवरील संकट टळले आहे. टोळधाडीची शक्‍यता वर्तविल्यानंतर त्याच्या खबरदारी-उपाययोजनांची तयारी कृषी विभागाने केली होती, अशी माहिती नाशिकचे कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com