Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharajesakal

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद झाला आहे. त्यांच्यासोबतच नाशिकमधून एकूण 6 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर दिंडोरीमधून 5 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

यामध्ये शांतिगिरी महाराज, अनिल जाधव, भक्ती गोडसे यांनी पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून, अनिल जाधव यांनी भाजपकडून तर भक्ती गोडसे यांनी देखील शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता.

एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर अपक्ष उमेदवारी मात्र कायम आहे. अर्ज छाननीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकूण 11 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 21 नाशिक लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननीत 36 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार

1) अरूण मधुकर काळे (बहुजन समाज पक्ष)

2) पराग प्रकाश वाजे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

3) हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना)

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार

(राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)

4. अमोल संपतराव कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी)

5) आव्हाड झुंजार म्हसुनी (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी)

6) कमलाकर बाळासाहेब गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल)

7) करण पंढरीनाथ गायकर (वंचित बहुजन आघाडी)

8) कांतीलाल किसन जाधव (आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया)

9) कैलास मारूती चव्हाण (आम जनता पार्टी (इंडिया)

10) कोळप्पा हनुमंत धोत्रे (भारतीय लोकशक्ती पक्ष)

11) जयश्री महेंद्र पाटील (सैनिक समाज पार्टी)

12) तिलोत्तमा सुनिल जगताप (बहुजन मुक्ती पार्टी)

13) दर्शना अमोल मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)

14) भाग्यश्री नितीन अडसुळ (इंडियन पिपल्स अधिकार पार्टी)

15) यशवंत वाळु पारधी (भारतीय अस्मिता पार्टी)

16) वामन महादेव सांगळे (धर्म राज्य पक्ष)

इतर उमेदवार

17) अनिल दयाराम जाधव (अपक्ष)

18) अरिंगळे निवृत्ती विठोबा (अपक्ष)

19) आरिफ उस्मान मन्सुरी (अपक्ष)

20) करंजकर विजय किसन (अपक्ष)

21) किसन शंकर शिंदे (अपक्ष)

22) गणेश बाळासाहेब बोरस्ते (अपक्ष)

23) चंद्रकांत केशवराव ठाकुर (अपक्ष)

24) चंद्रभान आबाजी पुरकर (अपक्ष)

25) जितेंद्र नरेश भाभे (अपक्ष)

26) दिपक विष्णु गायकवाड (अपक्ष)

27) देविदास पिराजी सरकटे (अपक्ष)

28) धनाजी अशोक टोपले (अपक्ष)

29) प्रकाश गिरधारी कनोजे (अपक्ष)

30) शशिकांत सुकदेव उन्हवणे (अपक्ष)

31) शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज (अपक्ष)

32) सचिनराजे दत्तात्रेय देवरे (अपक्ष)

33) सिद्धेश्वरानंद गुरूस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (अपक्ष)

34) सुधीर श्रीधर देशमुख (अपक्ष)

35) सुषमा अभिजीत गोराणे (अपक्ष)

36) सोपान निवृत्ती सोमवंशी (अपक्ष)

सोमवार दिनांक 6 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com