Nashik News : आदिवासींचा लॉंग मार्च महामार्गाने होणार मार्गस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 long march

Nashik News : आदिवासींचा लॉंग मार्च महामार्गाने होणार मार्गस्थ

नाशिक : आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी माजी आमदार जी पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्च (Long March) मोर्चा निघाला आहे.

सोमवारी सकाळी नाशिक मधून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघेल. (long march of tribals will be go on highway nashik news)

दरम्यान सध्या दहावीची परीक्षा असल्याने सदरील मोर्चा जुन्या मुंबई आग्रा महामार्गाने निघाला असता तर वाहतूक खोळंबा होऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. सदरची बाब पोलीस आयुक्तांनी लक्षात आणून दिल्यानंतर लॉंग मार्च मोर्चा महामार्गाने जाणार आहे.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लॉन्ग मार्च मोर्चा अधिवेशनावर काढण्यात आला आहे. सदरचा मोर्चा रविवारी रात्री नाशिक मध्ये दाखल झाला असून सोमवारी सकाळी मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होईल. अधिवेशन असल्याने मोर्चा रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दरम्यान मोर्चा शहरातील जुन्या महामार्गाने जाणार होता मात्र सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने या मार्गावर शाळा आणि विद्यार्थ्यांची याच मार्गाने जाणे येणे असल्याने मोर्चामुळे या परीक्षेवर परिणाम होण्याची दाट शक्यता होती.

हि बाब पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. आता हा मोर्चा नीमानी बस स्थानकावरून महामार्गाकडे उड्डाणपुलाखालून मुंबईच्या दिशेने जाणार आहे या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे तसेच ज्यादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Nashikdada bhuse