Nashik Kalaram Mandir : प्रभू रामचंद्रास आफ्रिकेतून आणलेली वल्कल प्रदान; भाविकांच्या उपस्थितीत विधिवत सोहळा

lord kalarama was presented with valkal specially brought from South Africa nashik news
lord kalarama was presented with valkal specially brought from South Africa nashik newsesakal

Nashik Kalaram Mandir : मर्यादा पुरुषोत्तम अशी उपाधी मिळविलेल्या पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळारामास शनिवारी (ता. २९) खास दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेली वल्कल (झाडाच्या सालापासून बनविलेले वस्त्र) प्रदान करण्यात आले.

विश्‍वस्त मंडळासह अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (lord kalarama was presented with valkal specially brought from South Africa nashik news)

प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण व पत्नी सीतामाईसह चौदा वर्षे वनवासात होते, यापैकी मोठा काळ त्यांचे पंचवटी परिसरात वास्तव्य होते. या काळात ते झाडाच्या सालापासून बनविण्यात आलेली वल्कलं वापरत असतं. तेव्हा भारतात झाडाच्या सालापासून वल्कलं तयार करण्याची कला अवगत होती, कालांतराने ती लुप्त झाली.

मात्र दक्षिण आफ्रिकेत अद्यापही झाडाच्या सालापासून वस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर गुजरातमधील बडोदा येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे सिद्धपुरुष कै. दत्तात्रेय श्रीपाद सप्रे गुरुजी यांनी आपल्या शिष्या प्रज्ञा जावडेकर यांच्याकडे बोलून दाखविली.

त्यानुसार त्यांनी पंचवटीतील श्री काळाराम व गोराराम मंदिरास प्रत्येकी दहा मीटर वल्कलं विधिवत प्रदान केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

lord kalarama was presented with valkal specially brought from South Africa nashik news
Nashik Shiv Mandir : अकराव्या शतकातील करोटक पद्धतीचे शिव मंदिर ; पाहा व्हिडीओ | Sakal Media |

आता त्यापासून श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईस वस्त्रे तयार करण्यात येणार आहेत. या वेळी श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईंच्या मूर्तींना खास नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला.

याप्रसंगी श्री काळाराम देवस्थानतर्फे विश्‍वस्त धनंजय पुजारी, ॲड. अजय निकम, शांताराम अवसरे यांच्यासह विनायक रानडे, सचिन जोशी, संजय परांजपे, विजय चंद्रात्रे, अशोकभाई राणा आदी उपस्थित होते.

कालौघात कला लुप्त

झाडाच्या सालापासून वल्कले (वस्त्रे) तयार करण्याची कला प्राचीन काळी भारतातही अस्तित्वात होती. कालौघात ही कला लुप्त झाली. मात्र आफ्रिका खंडात ही कला अद्यापही टिकून आहे. त्यामुळेच कै. दत्तात्रेय सप्रे गुरुजींनी ही वल्कलं श्रीरामास अर्पण करण्याचा ध्यास घेतला होता. तो यानिमित्ताने पूर्ण झाल्याचे बडोदा येथून आलेल्या सचिन जोशी यांनी सांगितले.

lord kalarama was presented with valkal specially brought from South Africa nashik news
Medical Admisssion : वैद्यकीयच्या नोंदणीसाठी या तारखेपर्यंत वाढीव मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com