जायखेडा- येथील पंचवीस वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधांतून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवकाच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन, तत्काळ अटक केल्याशिवाय मृतदेहाला हात न लावण्याचा पवित्रा घेत त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर शुक्रवार (ता.२७) रात्री उशिरापर्यंत धरणे धरले. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.