Nashik Crime News : प्रेमसंबंधातून प्रियकराकडून पतीचा खून; 8 तासातच गुन्ह्याची उकल

Police team
Police teamesakal

जायखेडा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील मोसम नदी काठावरील स्मशानभूमीलगत आढळलेल्या व्यक्तीच्या खुनाचा छडा लावण्यात जायखेडा पोलिसांना अवघ्या आठ तासात यश आले असून, पोलिसांनी मयताच्या पत्नीसह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (lover killed husband to love affair with his wife at jaykheda dead body found case nashik crime news)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. लाडूद येथील दत्तात्रेय ठाकरे याची पत्नी माधुरी ठाकरे (वय २५) हिचे नंदुरबार जिल्ह्यातील आसने येथील भरत इलाचंद पाटील (वय ३१) याच्याशी प्रेम संबंध होते.

आरोपी मयताच्या पत्नी बरोबर स्वतंत्र संसार थाटण्याच्या विचारात होता. मात्र मयत ठाकरे हा या प्रकरणात अडसर ठरत असल्याने आरोपीने काल रात्री ठाकरे यास दारू पाजून मोसम नदीकाठी नेले व त्याच्या साथीदार राकेश पावबा सावळे (वय १८) रा आसने ता.जि. नंदुरबार याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृण खून केला.

काल शुक्रवार (दि. २४)सकाळी जायखेडा स्मशानभूमीलगतच्या मोसमनदी काठावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती . गाव परिसरात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Police team
Nashik Crime News : मालेगावातील गवळीवाडा भागात 2 गटात हाणामारी; 12 जणांविरुध्द गुन्हा

जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल घटनेचा आढावा घेतला. मात्र मृत व्यक्ती कोण? कुठला? याची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसपुढे मोठे आव्हान ठाकले होते. पोलिसांनी तपासचक्र जोमात फिरवली असता पोलीस हवालदार राजेश सावळे यांनी जायखेडा पोलीसांना मयताच्या खिशातील औषधाच्या कागदावरून मयताच्या नावाचा उलगडा करण्यात यश आले. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह दोघ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक बीबी काळे, पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस हवालदार राजेश सावळे पोलीस, हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये पोलीस नाईक योगेश क्षीरसागर, उमेश भदाणे, शरद भगरे, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, होमगार्ड तुषार मोरे यांनी परिश्रम घेतले पोलिसांना माजी आमदार उमाजी बोरसे, पोलिसपाटिल योगेश खैरनार,कपिल अहिरे, अशोक जगताप, बापू खुडानकर यांनी तापासकामी मदत केली.

Police team
Lonar Crime News: लोणार तालुक्यात हाणामारी एकाचा खून ; चार आरोपीना केली तात्काळ अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com