Lonar Crime News: लोणार तालुक्यात हाणामारी एकाचा खून ; चार आरोपीना केली तात्काळ अटक

Lonar Crime News: मोबाईल च्या मॅसेज वरून हाणामारी
Lonar Crime News
Lonar Crime Newssakal

सिंदखेड राजा : लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भुमराळा येथील गणेश चिंतामण चव्हाण यांनी शेवली येथील एका मुलीच्या मोबाईलवर मेसेज केला असता याचा जाब विचारण्यासाठी तिचे नातेवाईक तारीख २३ मार्च रोजी भुमराळा येथे आले असता चव्हाण कुटूंबीय व नातेवाईकात भांडण होऊन

यात भानुदास रोहिदास चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची घटना तारीख २३ मार्च च्या दुपारी घडली याप्रकरणी बीबी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सविस्तर असे बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथील गणेश चिंतामण चव्हाण याने शेवली ता.जिल्हा जालना येथील एका तरुणीच्या मोबाईल वर मेसेज केला होता,

Lonar Crime News
Akola : एकच मिशन जुनी पेंशन; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी

त्याचा राग धरून त्या मुलीचे नातेवाईक भुमराळा येथे गणेश चव्हाण याला जाब विचारण्यासाठी आले होते. दोघांना मध्ये बोलणे सुरू असताना त्यांच्यामध्ये हाणामारी सुरु झाली सदर भांडणे सोडवण्यासाठी गणेशचा चुलता भानुदास रोहीदास चव्हाण वय ५० वर्ष हे गेले असता.

अशोक कहाळे, सिमा नितीन कहाळे रा.रुम्हणा ता.सिंदखेड राजा, दिलीप यशवंत कहाळे,मंगल दिलीप कहाळे रा.शेवली ता.जिल्हा जालना यांनी त्यांना गंभीर मारहाण केली

यात त्यांचा मुत्यू झाला अशी फिर्याद मृतकाची पत्नी प्रयागबाई भानुदास चव्हाण यांनी बीबी पोलीस स्टेशन ला दिली असता यावरुन पोलीसांनी अशोक कहाळे, सिमा नितीन कहाळे, दिलीप यशवंत कहाळे,मंगल दिलीप कहाळे या चार आरोपींविरुद्ध अपक्र ५६/२०२३ कलम ३०२ खूनाचा गुन्हा दाखल केला,असून चारही आरोपींना अटक केली आहे, पुढील तपास ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.अरुण सानप हे करीत आहे.

पोलिसांकडून आरोपींना तात्काळ अटक :-

बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांना घटनेची ग्रामस्थांनी माहिती दिली, त्यानंतर ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी तात्काळ वेळ न जावू देता,शासकीय वाहन घेवून स्वतः व पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन भुमराळा या गावांमध्ये दाखल होऊन आरोपींना तात्काळ अटक केली आहे,

Lonar Crime News
Akola News : धक्कादायक! "सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला, पण मुलगी झाल्याने..."

त्यामुळे आरोपींना पळून जाता आले नाही.घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी ४ आरोपींना तात्काळ अटक केली.यावेळी पोलीस कर्मचारी अरुण सानप, बद्रीनारायण कायंदे, अर्जुन सांगळे ,यशवंत जैवळ यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com