Communication with Agniveer | याद रखना ये फौज हे मौज नही : लेफ्टनंट जनरल अय्यर

Commanding Officer of the School of Artillery Lt. General S. Harimohan Iyer (AVSM).
Commanding Officer of the School of Artillery Lt. General S. Harimohan Iyer (AVSM).esakal

नाशिक : जुन्या पिढीतील जवान आणि सध्याचे शिक्षित अग्निवीर यांच्यात मोठी तफावत आहे. पुर्वीप्रमाणे तीन तीन वर्ष फक्त केवळ प्रशिक्षणच घेत रहायचे अशी संधी नाही. फौज हे मौज नही या न्यायाने वेळेचे महत्व विचारात घेउन प्रशिक्षण आत्मसात करुन लगेच जबाबदाऱ्या पेलायला सज्ज व्हावे लागणार आहे.

अशा शब्दात तोफखाना केंद्राचे कमांडट, लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर (एव्हीएसएम) यांनी केले. (Lt Gen Iyer statement in Communication with Agniveer first batch nashik news)

नाशिक रोड तोफखाना प्रशिक्षण केंद्रात २६२३ अग्निवीर प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या पहिल्या तुकडीतील अग्निवीरांशी संवाद साधला. अग्निविरांमध्ये सहभागी होउन कुठून आला, प्रशिक्षण समाधानी आहे का, सोडून जायचे का? कशात प्राविण्य मिळवायचे आहे या आणि अशा प्रश्नोत्तरांतून संवाद वैयक्तीक तसेच सामुहीक संवाद साधला. प्रशिक्षण केंद्राचे कमाडिंग ऑफीसर ए रागेश हेही उपस्थित होते.

कमांडट अय्यर म्हणाले की, जुन्या आणि आताच्या पिढीतील जवानात खूप फरक आहे. पुर्वी वाहन चालक ऑपरेटर तयार करावा लागत, आता अग्निवीर हा नवीन पिढीतील शिक्षित तसेच मोबाईल संगणक ओळख असलेला जवान येण्यापुर्वीच वाहन संगणक व इतर तंत्र आत्मसात करुन आलेला आहे.

तसेच युद्धाचे स्वरूपही पुर्णपणे बदलेले आहे. मैदानावरच नव्हे तर शत्रू आता डोक्यात घूसून प्रहार करीत आपल्याला भष्ट्र करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे अग्निवीरांना अधिक सजगतेने अभ्यास करावा लागणार आहे.

हा सगळा बदल विचारात घेऊन खूप परिश्रमपुर्वक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला आहे. युद्धाचे साहित्य आयुध बदलली आहे. अनेक महागडी हत्यार हाताळण्याची संधी तुम्हाला प्राप्‍त होत असल्याने कमी वेळेत हे साध्य करण्याची तयारी करतांना खूप महत्व आहे. तसेच कमी वेळेत अधिकाधिक कौशल्य साध्य करण्याला महत्व आले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Commanding Officer of the School of Artillery Lt. General S. Harimohan Iyer (AVSM).
Teacher Convention : शिक्षक संघाचे रत्नागिरीत 17 फेब्रुवारीला अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

...तर आताच माघारी फिरा

वैयक्तीक संवाद साधतांना त्यांनी अनेक अग्निविरांशी थेट संवाद साधून प्रशिक्षणात काही अडचणी आहेत का हेही विचारले. अग्निवीर म्हणून भरती होण्याचा निर्णयाचा पुर्नविचार करावासा वाटतो का? हेही विचारले.

मन लागत नसेल तर आताच स्पष्ट सांगा इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी विचारणा केली. लष्करातील काम ही देशसेवा आहे. उच्च शिक्षण, विविध खेळातील प्राविण्य मिळविण्याच्या तोफखाना केंद्रात संधी आहे त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन केले.

दिमाख बक्सेमे नही रखते

लष्करात येणारा जवान हा पेटी घेऊन येतो हे प्रातिनिधीक चित्र आहे. जवान आणि पेटीचा संबध असतो. पण यात एक लक्षात ठेवा की, जवानांने त्याच्या पेटीत फक्त त्याचे साहित्य ठेवायचे असते. त्याचा मेंदू नव्हे. मेंदू डोक्यात घेऊनच लष्‍करात निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे शारीरीक कसरती करतांनाच मेंदूची कल्पकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू ठेवा.

Commanding Officer of the School of Artillery Lt. General S. Harimohan Iyer (AVSM).
Kho-Kho Competition : कौशल्या पवारची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो -खो स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com