नाशिक: जेल रोड परिसरातील एमएसीबी कॉलनीत कारमधून आलेल्या एका स्वयंघोषित संशयित नागा साधूने ५५ वर्षीय व्यक्तीला संमोहित करून त्यांची सोन्याची अंगठी व रोकड असा ऐवज काढून घेत फसविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.