esakal | PHOTOS : बैलाच्या पाठीवर राजकारणाचे प्रतिबिंब; युवा शेतकऱ्याकडून अफलातून रंगरंगोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Pola

PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

sakal_logo
By
घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

दाभाडी (जि. नाशिक) : ग्रामीण भागात बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना येथील युवा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मयूर अमृत निकम यांनी आपल्या बैलजोडीवर व्यंगचित्र आणि चपखल घोषवाक्य रंगवत लक्षवेधी परिणाम साधला. येथील पंचक्रोशीत या अफलातून प्रयोगाला पसंतीची मोहोर उमटली आहे.

बैलांच्या अंगावर येथील चित्रकार राम निकम यांच्या कुंचल्यातून माजी कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे तैलचित्र रंगवत ‘८० वर्षाचा तरुण’ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार नारायण राणे यांच्या जुगलबंदी व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या तैलचित्रासह ‘बांधावरील कृषिमंत्री’ अशी बिरुदावली बहाल करत अभिवादन केले आहे. आकस्मित निधन पावलेल्या सचिन गुंड आणि सिद्धार्थ पाटील या दोन मित्रांना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमृत निकम यांचे चिरंजीव मयूर निकम व पूनम निकम यांनी बैलांचे औक्षण केले. या बैलजोडीची गावात मिरवणूक काढण्यात आली.

उद्धव ठाकरे व खासदार नारायण राणे जुगलबंदी

उद्धव ठाकरे व खासदार नारायण राणे जुगलबंदी

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे तैलचित्र

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे तैलचित्र

हेही वाचा: नाशिक : 'सीएनजी'साठी भल्‍या पहाटेपासून रांगा

loading image
go to top